गणपती आणि मी – ओट्यावरच्या गप्पा

God, Ganpati, गणपती, Ganpati Bappa, गणपती बाप्पा, friendship with God, देव आणि मैत्री, देवाशी मैत्री, spirituality, अध्यात्म, atheism, नास्तिकता, faith, श्रद्धा, belief, विश्वास, God and humans, देव आणि माणूस, existential thoughts, अस्तित्वाचे प्रश्न, mystery of God, देवाचं गूढ, imagination, कल्पनाशक्ती, midnight thoughts, पहाटेचे विचार, late night thoughts, रात्रीचे विचार, insomnia, झोप न येणे, self reflection, आत्मचिंतन, inner thoughts, मनातले विचार, insecurity, न्यूनगंड, friendship, मैत्री, relationships, नाती, human psychology, मानसशास्त्र, spirituality and psychology, जीवनविचार, philosophical thoughts, तत्त्वचिंतन, Marathi blog, मराठी ब्लॉग, Marathi writing, मराठी लेखन, personal blog, वैयक्तिक लेख, Ganpati thoughts, गणपती विचार, unconventional spirituality, आधुनिक अध्यात्म, relatable thoughts, मनोगत, आयुष्य, जीवन, हास्य आणि अध्यात्म

पहाटेचे ४.२३ झालेत. मला अजून झोप आलेली नाही. दिवसभर पुण्यात झालेला प्रवास, १३ हजार पावलं, रात्री केलेली अंघोळ आणि उशीरा आलेल्या DM ला केलेला रिप्लाय, या सगळ्याचं संचित म्हणून मी जागा आहे. खरंतर मला झोप लागली होती, १२-१२.३० च्या आसपास, पण घरात कोणीतरी काहीतरी आवाज केला आणि मला जाग आली होती. 

त्या DM शी बोलण्यात काही वेळ गेला, ती २ आसपास झोपली असं वाटतं, कारण येणारे रिप्लाय बंद झाले. तेव्हा पासून मी, मोबाईल आणि अंगठा अशी तिहेरी प्रेम कथा चालू आहे. खरंतर मला ५.३० पर्यंत उठून ठाण्यात जायचंय आणि मला दिवसभर काम आहे, रात्री १० पर्यंत झोप यायला हवी होती पण अल्पमतामुळे अनामत रक्कम जप्त झालेल्या उमेदवारासारखी अवस्था झालिये माझी. सत्ता हवीये पण… असो!

बराच वेळ मोबाईल वर टाईमपास करून मी ठरवलं की आता झोपूयाच. त्या निर्धाराने मी मोबाईल ठेवला आणि शेवटचं वॉशरूमला जायला उठलो. परत येता येता वाटेत फ्रिज लागला म्हणून वन फॉर द रोड असं म्हणत पाणी प्यायला थांबलो. फ्रिज उघडला, त्याचा तो लाईट लागला आणि अचानक मनात एक विचार आला. या लाईटमधून प्रथमपूज्य असा गणपती बाहेर आला तर? तसं पहायला गेलं तर मी नास्तिकच, किंबहुना असा आस्तिक जो देवाला आपल्या वरचा कोणी साहेब किंवा बाप न मानता आपला मित्र समजतो, आपल्या लेव्हलचा! 

या स्वभावाच्या मला जेव्हा लाईटमधून गणपती ही संकल्पना सुचली तेव्हा हसायलाच आलं, आणि झोपेचं महत्व देखील लक्षात आलं. तरी आता आलेल्या विचाराचं स्वागत करून त्यावर विचारमंथन करून त्या विचाराचा चोथा करायचा म्हणून मी विचार चालू ठेवला.

की पहाटेच्या ४.२३ वाजता आला बाबा तो गणपती माझ्या समोर, तर काय होईल. मग माझ्या डोक्यात आमच्यातला पूर्ण संवाद तयार झाला.

गणपती – हॅलो! 

(माझा विचार, माझा ब्लॉग, त्यात गणपती बाप्पा हॅलो म्हणतो, चालवून घ्या.)

मी – अरे, गणपती बाप्पा.. इकडे कुणीकडे.. 

गणपती – मला जरा तहान लागली होती, म्हणून समोरच्या देव्हाऱ्यातून इथे पाणी प्यायला आलो.

मी – गंमतच म्हणायची की. बरं, आलास तो आलास, मला कसा काय दिसलास? Invisibility system under maintenance आहे की काय? 

गणपती – तू पण जागा होतास, मला ही कंटाळा आला होता, म्हटलं होऊन जाऊदे.

मी – ये भी ठीक है.. बरं मला सांग, तू खरंच आलायस की you are a figment of my imagination? 

गणपती – खरंच आलोय बाबा, काय पुरावा दाखवू तुला? 

मी – काही नको. कारण तू खरा असलास काय किंवा figment of imagination असलास काय, मी म्हणेन ते तू करून दाखवू शकतोस आणि तरी ही मी सांगू शकत नाही की तू नक्की कुठला आहेस! 

गणपती – मग आता कसं करायचं? 

मी – तू दोघांपैकी कोणीही असलास तरी काय फरक पडतो, मला तू काहीच करायला नकोय. कारण ते खरं की खोटं हे सांगणं अशक्य! त्या पेक्षा तू एक काम कर ना, तू फ्रिज मधून बाहेर ये, आपण गप्पा टाकू. ये इकडे किचनच्या ओट्यावर बसू..

गणपती – ये भी ठीक है.. 

आम्ही दोघे किचनच्या ओट्यावर बसलो. 

मी – बोला राजे! 

गणपती – काय बोलू?

मी – काय चालतंय आयुष्यात? 

गणपती – चाललंय भाई, तुम्ही बोला.

मी – काही नाही रे भाई, आजच तुझी आठवण काढली. पुण्यात meeting ला मनसोक्त खायचा विषय निघाला होता, मी मागच्या गणेशोत्सवात दीड दिवसात २१ मोदकांचा नैवेद्य स्वतःला दाखवला ते सांगत होतो सगळ्यांना.

गणपती – हो आठवतं की मला, मोदक मस्त झाले होते. 

मी – हो.. त्यानंतर परत मी गोड बंद केलं but that was worth it haan.  

गणपती – ऑफ कोर्स ब्रो..

मी – वाह दादा वाह.. genZ fluent येतं की तुला.

गणपती – परवाच ९९ रुपये भरून ३ तासाचा मास्टरक्लास केलाय ब्रो.

मी – अँडव्हान्स कोर्स कितीला विकत होते? 

गणपती – १६ हजार. मी नाही घेतला.

मी – म्हणजे तुला sybau वगैरे चा अर्थ नसेल माहिती अजून.

गणपती – ते काय असतं?

मी त्याला हळूच फुलं फॉर्म सांगितला. 

मी – मला पण माझ्या एका मैत्रिणीने शिकवलाय. OG ना? 😂

गणपती – खतरनाक! पुढच्या वेळी माझ्याकडे फुकट नवसाचं डील घेऊन येणाऱ्या लोकांना हेच म्हणणार मी आता. 😂

मी – श्या.. म्हणजे ‘ळे पू ती प ण ग’ ला जाणारे नवसाचे नवरे दिसणार नाही आता. 

गणपती – त्यात पण माझा नवस मलाच पूर्ण करावा लागला होता. काम पण मीच करायचं आणि रिकव्हरी सुद्धा मीच.. तूच सांग ब्रो याला किती अर्थ आहे? 

मी – खरंय भावा. म्हणून मी कधी असं फालतू डील घेऊन येत नाही तुझ्याकडे. 

गणपती – तू तर तसाही येत नाहीस रे. मग आम्हालाच यायला लागतं असं फ्रिजच्या लाईटातून.. 

मी – बरंय की मग, त्या निमित्ताने जरा हवापालट झाली.. थंड हवेच्या ठिकाणी आलास तू. 🤣

आम्ही दोघं ही हसलो..

मी – तुला एक विचारू का bro?

गणपती – yes bro, go ahead! 

मी – मी सोडून किती माणसं तुला मित्र म्हणतात? 

गणपती – umm, खूपच कमी रे. का विचारतोयस?

मी – त्या दिवशी एकाशी याच विषयावर बोलत होतो की मी जरी देव आहे असं म्हटलं तरी तो माझा मित्र आहे, सर्वेसर्वा नाही.

यावर असाच विचार करत असताना मनात स्वतःला विचारलं की तू माझा मित्र का आहेस? तर तेव्हा एक थिअरी आली डोक्यात. मला फारच आवडली. एकदम विचार करण्यासारखी आहे.

गणपती – काय ते? मला ही सांग. एकत्र विचार करू.

मी – Jimmy Carr म्हणतो की God is a blanket that we put on the mystery to give it a shape. I love that quote.. 

मला असंही वाटतं की त्या mystery सोबत आपण ते नातं जोडतो जे आपल्याला आपल्या आयुष्यात हवंय असं वाटतं. म्हणजे, लहानपणी आपल्याला ज्या नात्यांकडून हवं तेवढं प्रेम नाही मिळालं, किंवा कमी पडलं, तर ते लोकं तुझ्यात शोधतात..

थोडक्यात, ज्याला जे नातं हवंहवंसं असतं ते तो तुझ्याशी जोडतो.. जसं मी तुला मित्र म्हणून बघतो कारण मला लहानपणी असं वाटायचं की लोकं माझ्याशी बोलतात, पण हे माझे मित्र नाहीयेत.. or you know, even if they call themselves my friends, I don’t really deserve to be their friend. हा माझा न्यूनगंड किंवा insecurity असेल, पण मला नाही वाटलं की खरंच कोणी मला मनापासून आपला मित्र मानतं. म्हणून मी तुझ्यात मित्र शोधला. काही लोकं तुझ्यात आई शोधतात तर काही बाप, तर कोणी अजून काही…

गणपती – यावर मी फक्त स्मितहास्य केलं आणि काहीही न बोलता गायब झालो तर तुला काय वाटेल? 🤣

मी – that you have really understood your assignment to be a friend to me. 🤣

गणपती – वाह दादा वाह! 😂

मी – तसंही मला तुझ्याकडून कुठल्याही उत्तराची किंवा validation ची अपेक्षा नाही, मी फक्त मनात आलं ते सांगितलं. It was really intriguing to me..

गणपती – well, I am supposed to be the all knowing.. so if I really want to, I can tell you whether you are right or not! 

मी – Well, I don’t want to know! आमचे लूफी तात्या म्हणतात तसं, if it’s a boring adventure, I don’t want to go. 

गणपती – And that’s why we are friends bro! 

मी – Hahaha Cool!! 

गणपती – आता काय? 

मी – आता काय, पहाट झाली almost. आता झोपायचं.. म्हणजे मी तरी झोपतो, तुझी उठायची वेळ झाली.. लोकं त्यांच्या सुप्त नातेवाईकाला सकाळी सकाळी काकड आरती करुन उठवायला येतीलच! तुझं चालुदे.. कधी मित्राची गरज लागली तर तो आहेच इथे! 

गणपती – I might just take you up on that bro!! For now, back to fridge light! 

मी – or, back to my figment of imagination! 

गणपती – Touche! 😂

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top