चंद्र आणि माकड

चंद्र आणि माकड - sadhuwani

सकाळी चालायचं राहून गेलं होतं म्हणून आज जेवण झाल्यावर रात्री चालायला आलो होतो. आता आपल्याला कुत्र्यांची भीती वाटते बुवा, म्हणून शांतपणे आमच्या गच्चीवर चालायला आलो.

चालता चालता असंच गाणी म्हणत होतो, विचार करत होतो तेवढ्यात चंद्राकडे नजर गेली, किती लांब आहे आपल्यापासून चंद्र. चटकन एक विचार डोक्यात आला की माझ्या जमातीतल्याच एका माणसाने हे चंद्र पर्यंतच अंतर शोधून काढलं. आर्यभट्ट यांनी आपल्याला शून्य दिला, नंतर कोणीतरी आपल्याला डेसिमल सिस्टीम दिली, आणि त्यानंतर आपण ते अंतर मोजलं, आणि नुसतं मोजलच नाही तर आपण चंद्रावर गेलो सुद्धा! हे किती अनाकलनीय, अविश्वसनीय आणि अतुलनीय आहे! मला माणूस म्हणून जन्माला आलो याचा अभिमान वाटला.

याच अभिमानात चालत असताना शेजारच्या गच्चीवर एक काका आले, त्यांच्या हातात एक प्लास्टिकची पिशवी होती. ते आले, गच्चीच्या कडेला गेले, त्यांनी आपला हात गरागरा दोन वेळा फिरवला आणि ती पिशवी खाली भिरकावून दिली.

त्यावेळी मला वाटलं, काही माणसं माकडच राहिली असती तर किती बरं झालं असतं.

 

12 thoughts on “चंद्र आणि माकड”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top