कधी कधी तीन मिनिटांचा रस्ताही तुमचं आयुष्य सांगून जातो.
परवा मी आणि बहिणाबाई डोसा खायला बाहेर जाताना, चालत ३ मिनिटांवर असलेल्या हॉटेलमध्ये जायला आम्हाला २० मिनिटं लागली, बरीच लोकं भेटली, माझे ३-४ गोड बॉडीगार्ड भेटले, त्यांना बिस्किट्स हवे होते म्हणून. आता माझी बहीण तर सगळ्यात मोठी इंट्रोवर्ट, आणि कुत्र्यांना पण प्रचंड घाबरते. ही पोरगी मला म्हणते, तुझ्या सोबत कुठेही बाहेर जायचं म्हणजे ताप आहे डोक्याला, आजूबाजूला नुसती माणसं आणि कुत्रे. 😂
मी आधी स्वतःला माणसात रमणारा माणूस म्हणायचो, आता जगात रमणारा म्हणतो, एवढाच काय तो फरक.